Coconut Detect Underground Water: चंद्रावर पाणी कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञानाने पुरेशी प्रगती केली असली, तरी तळहातावर नारळ किंवा पाण्याचा ग्लास घेऊन भूगर्भात पाणी शोधण्याच्या पारंपरिक, अवैज्ञानिक पद्धती आजही ग्रामीण भागात प्रचलित आहेत.
केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या दुर्गम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे त्यांच्या शेतात पाणी शोधण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांना बोलावण्याइतका वेळ किंवा पैसा नाही.
त्यामुळेच अनेक शेतकरी त्यांच्या शेतात बोअरवेल बसवण्यासाठी फील्ड सर्व्हेअर आणतात. शेतातले पाण्याचे स्रोत शोधण्यासाठी ते एखाद्या वस्तूचा वापर करतात आणि त्या वस्तूच्या मदतीने जिथे पाणी असल्याचं वाटतं, तिथे खड्डा खणायला सांगतात.
Coconut Detect Underground Water
पाण्याचा शोध घेण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात, त्यामध्ये नारळ, इंग्रजी ‘Y’ अक्षराप्रमाणे दिसणारी कडुनिंबाची काडी, पाण्याने भरलेली दोन भांडी अशा गोष्टींचा समावेश आहे.
पण या पद्धती खरंच वैज्ञानिक आहेत का? भूगर्भशास्त्रज्ञ त्याबद्दल काय म्हणतात? या पद्धतीवर विश्वास ठेवणारे शास्त्रज्ञ काय म्हणतात? बीबीसी तेलुगूने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या पद्धती किती विश्वासार्ह आहेत, याचा पडताळा घेतला.
जमिनीत पाण्याचे स्रोत कसे शोधतात?
सुरेंदर रेड्डी यांनी त्यांना माहीत असलेल्या काही पद्धतींद्वारे जमिनीतील पाण्याच्या प्रवाहांचा शोध घेतला होता. त्यांनी चित्तूर आणि तिरुपती जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना विहीरी खोदायला मदत केली आहे.
ते आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्याचे आहेत. ते (Coconut Detect Underground Water) शेतात पाणी शोधण्यासाठी नारळ, ‘वाय’ आकाराची कडुनिंबाची फांदी किंवा पाण्याचा तांब्या ठेवतात.
ते नारळ तळहातावर ठेवतात. शेंडीकडचा भाग हा बोटांच्या दिशेला असतो. अशापद्धतीने नारळ हातावर ठेवून ते शेतात फिरतात. एखाद्या जागी नारळ सरळ झाला तर तिथे जमिनीत पाणी आहे, असा त्यांचा अंदाज असतो. ते कधीकधी Y-आकाराची कडुनिंबाची काठी हातावर ठेवून फिरतात. जिथे पाणी आहे, तिथे काठी सरळ राहते.
पाण्याचा तांब्या वापरण्याच्या पद्धतीबद्दलही सुरेंदर सांगतात.
हातावर पाण्याचा तांब्या घेऊन फिरताना ज्या ठिकाणी (Coconut Detect Underground Water) तांब्यातलं पाणी सांडतं तिथे विहीर खोदता येते, असं सुरेंदर यांचं म्हणणं आहे.
“बोअर कुठे खणता येईल, याबद्दल माझे काही आडाखे आहेत. मी या पद्धती स्वतःच शिकलो आहे. भूगर्भातील पाण्याचा स्रोत हा एका ऊर्जेतून शोधता येतो. नारळ किती सरळ होतो, यावरून किती फूट खणल्यावर पाणी लागेल हेही सांगता येत,” असं सुरेंदर रेड्डी सांगतात.
“मी 99 टक्के वेळेस अचूक पाणी शोधलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी हे काम करत आहे. माझ्याइतक्या अचूकपणे भूगर्भशास्त्रज्ञही हे सांगू शकत नाहीत. म्हणूनच शेतकरी त्यांच्यावर माझ्याइतका विश्वास ठेवत नाही,” सुरेंदर रेड्डी सांगतात.
“जर जमिनीत पाणी असेल, तर नारळ किंवा फांदी (Coconut Detect Underground Water) सरळ उभे राहतात. जिथे पाण्याचे दोन-तीन प्रवाह असतील, तिथे नारळ किंवा फांदी फिरते,” असंही ते सांगतात.
‘या सगळ्या अवैज्ञानिक पद्धती’
तिरुपती इथले भूगर्भशास्त्रज्ञ आणि भूजल सल्लागार सुब्बारेड्डी सांगतात की, नारळ, कडुलिंबाच्या फांद्या, पाण्याची भांडी यांचा वापर करून पाणी शोधण्याच्या पद्धती वैज्ञानिक नाहीत.
सुब्बारेड्डी असंही सांगतात की, काही लोकांच्या हातावरच पाण्याचीही एक रेषा असते आणि देव त्यांच्या स्वप्नात येऊन पाणी कुठे आहे हे सांगतो असाही अनेकांचा दावा असतो.
मात्र या गोष्टीत काही तथ्य नाहीये, केवळ वैज्ञानिक पद्धतींनी पाण्याचा शोध अचूकपणे घेता येतो, असं सुब्बारेड्डी सांगतात.
“जेव्हा जमिनीत पाण्याचे स्रोत भरपूर असतात, तेव्हा कोणत्याही पद्धतीने पाणी यादृच्छिकपणे शोधले जाऊ शकते. अशावेळी पद्धत अशास्त्रीय असली, तरी पाणी सापडतंच. पण जिथे बोअरवेल हजार फूटापर्यंत खोदल्या जातात, तिथे पाण्याचे स्रोत कमी असतात. अशाठिकाणी पाणी सापडण्याच्याही शक्यता कमी होतात.
त्यामुळेच अशा भागात शास्त्रीय पद्धतीने पाणी शोधण्याचा (Coconut Detect Underground Water) प्रयत्न केला तरी पाणी येत नाही. त्यामुळेच इथे पाणी खोदणं हा पैशाचा अपव्यय आहे,” असं सुब्बारेड्डी म्हणतात.
वैज्ञानिक पद्धती किती अचूक आहेत?
सुब्बारेड्डी म्हणतात की, भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी वैज्ञानिक पद्धती उपयुक्त आहेत. यासाठी रेझिस्टिव्हिटी मीटर म्हणजेच विद्युत प्रतिरोधक सर्वेक्षण ही जगभरात वापरल्या जाणाऱ्या पद्धतींपैकी एक वैज्ञानिक पद्धत आहे.
ते पुढे सांगतात की, “आम्ही रेझिस्टिव्हिटी मीटरचा वापर करून पृथ्वीच्या थरांतील विद्युतीय प्रतिकारशक्तीचा अंदाज लावतो. यावर आधारित आलेख (Coconut Detect Underground Water) काढला जातो. परिणाम सकारात्मक आहेत की नाही हे तपासून भूगर्भातील पाणी शोधून काढतो.”
“भूगर्भातील पाणी किती खोलवर आहे हे ठरवण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला जाऊ शकतो. या पद्धतींमध्ये पृथ्वीचा पहिला थर किती खोल आहे आणि दुसरा थर किती खोल आहे हे बघतात. त्यानंतर कठीण खडक जिथे आहे तिथे न खोदता शास्त्रोक्त पद्धतीने खोदण्याचा निर्णय घेतला जातो.”