Animal Farming Scheme | पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांचा पुरस्कार ! फक्त हे काम करा

Animal Farming Scheme | पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांचा पुरस्कार ! फक्त हे काम करा

Animal Farming Scheme

Animal Farming Scheme: देशाच्या ग्रामीण भागात अगदी शेती व्यवसायाच्या सुरूवातीपासून पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. पशुपालन हे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन असल्याचे जाणकार लोक देखील सांगत आहेत. पशुपालन व्यवसायाला तसेच दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी मायबाप शासनाकडून  वारंवार वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जात आहेत.

पशुसंवर्धन क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करण्यासाठी देशातील शेतकरी बांधवांना आणि ग्रामस्थांना शासनाकडून आता मोठ्या प्रमाणात. प्रोत्साहन दिले जात आहे. माय-बाप शासनाकडून पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी पशुपालन करणाऱ्या शेतकरी बांधवांना गोपाल रत्न पुरस्कार दिला जात आहे.

Animal Farming Scheme

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने 2022 च्या राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांसाठी अर्ज मागवले जात आहेत. मित्रांनो या पुरस्कारासाठी इच्छुक पशुपालक शेतकरी बांधवांना अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा : 500 शिळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान येथे माहिती 

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी येथे नमुद करु इच्छितो की, राष्ट्रीय दूध दिनानिमित्त (26 नोव्हेंबर 2022) गोपाल रत्न पुरस्कार पात्र पशुपालक शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.

शेतकरी बांधवांना या पुरस्कारा संबंधित कोणतीही शंका असेल किंवा पात्रता इत्यादींबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तसेच ऑनलाइन अर्ज सादर करायचा असेल तर पशुपालक शेतकरी बांधवांना https://awards.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.

पुरस्काराचा उद्देश तरी नेमका काय

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग शेतकर्‍यांना शाश्वत जीवन जगण्यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायाचा प्रभावी विकास करण्याच्या उद्देशाने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. डिसेंबर 2014 मध्ये देशात प्रथमच “राष्ट्रीय गोकुळ मिशन (RGM)” लाँच करण्यात आले. या अंतर्गत दरवर्षी दुग्ध उत्पादक शेतकरी, सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ आणि दूध उत्पादक कंपन्यांना गोपाल रत्न पुरस्कार दिला जातो. 

या पुरस्कारासाठी पात्रता आणि निकष खालीलप्रमाणे असतील

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, गोपाल रत्न पुरस्कारासाठी फक्त तेच शेतकरी पात्र आहेत, जे गायीच्या 50 देशी जाती आणि म्हशीच्या 18 देशी जातींपैकी कोणत्याही एका जातीचे पालन करतात.

गोपाल रत्न पुरस्कार योजना चा फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा

या गोपाल रत्न पुरस्कारासाठी किमान 90 दिवसाचे कृत्रिम रेतन विषयाचे प्रशिक्षण घेतलेले कृत्रिम रेतन तंत्रज्ञ पात्र राहणार आहेत. दररोज 100 लिटर दूध उत्पादन करणारी दूध उत्पादक कंपनी मात्र अशा कंपनीत सुमारे 50 शेतकरी जोडलेले असणे अतिशय आवश्यक आहे.

तीन गटात पुरस्कार दिले जातात

राष्ट्रीय गोकुळ किसान मिशन योजनेंतर्गत दरवर्षी या तिन्ही गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास पारितोषिके दिली जातात.

  1. प्रथम पारितोषिक म्हणून 5 लाखांची रक्कम
  2. दुसऱ्या क्रमांकासाठी तीन लाखांची रक्कम
  3. तृतीय क्रमांक धारकांना दोन लाखांची रक्कम दिली जाते.

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग प्रत्येक श्रेणीतील गुणवत्तेचे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि पुरस्कार विजेत्यांना ठराविक रक्कम देतो.


📢 कडबा कुट्टी मशीन साठी शासन देते आहे 50% अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: Content is protected !!