Agricultural Electricity | शेतकऱ्यांना मिळणार आता 24 तास लाईट ! पहा याचे काय आहे कारण

Agricultural Electricity: शेतकऱ्यांना शेतीत पिकाला पाणी द्यायचा म्हटलं की, रात्री अपरात्री वीज मिळते. तेव्हा त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतीतील (Agriculture)पिकालापाणी द्यावं लागते. कारण दिवसा विज (Electricity) मिळेल याची शाश्वती नाही.

Agricultural Electricity

म्हणूनच शेतकऱ्यांकडून दिवसा वीज  मिळावी अशी मागणी केली जाते. आता शेतकऱ्यांसाठी एक खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता शेतकऱ्यांना 24 तास विजेचा पुरवठा केला जाणार आहे.

वीजपुरवठा महवितरण यंत्रणा स्मार्ट
विजेची सतत वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी सध्याची वीज वितरण व्यवस्था अधिक मजबूत आणि अत्याधुनिक करण्याची गरज आहे. राज्य वीजपुरवठा कंपनी महावितरणमध्ये पुरवठा यंत्रणा स्मार्ट करण्यासाठी 39,602 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

त्यापैकी 14 हजार 266 कोटी रुपये वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरणासाठी खर्च केले जाणार आहेत. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा : शेतात लव्हाळा तण आहे तर त्यासठी करा हे उपाय 100% होणार फायदा 

कोणती आहे ‘ही’ योजना?
राज्यातील वीज वितरण कंपनीची कार्यक्षमता वाढवून आर्थिक (Financial) स्थिरता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक सहाय्याने सुधारित वितरण क्षेत्र योजना (RDSS) राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे (Yojana) महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार आहे. वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत.

किती केला जाईल खर्च?
महावितरणच्या ग्राहकांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि परवडणारी वीज उपलब्ध करून देण्यासाठी वितरण व्यवस्था मजबूत आणि आधुनिक करण्यासाठी 14 हजार 266 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये राज्यात विविध ठिकाणी 377 नवीन उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत.

हेही वाचा : कापूस पिकाचे तन व कीटकनाशक चे कसे करावे नियत्रण येथे पहा 

24 तास मिळणार वीज
299 उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहेत. 292 उपकेंद्रांची क्षमता वाढवून सुमारे 29 हजार 893 नवीन वितरण पेट्या बसवण्यात येणार आहेत. याशिवाय 21 हजार 691 सर्किट किमी उच्च दाबाची ओव्हरहेड वाहिनी आणि 4 हजार 171 सर्किट किमी उच्च दाबाची भूमिगत वाहिनी टाकण्यात येणार आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनीही या योजनेमुळे ग्राहकांना 24 तास अखंड. आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले आहे.


📢 नवीन विहीर साठी शासन देणार आहे 3 लाख रु अनुदान :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!