दोन रुपये किलो दराने गहू
दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ या योजनेतून दिले जात आहे. मात्र एपीएल शेतकरी गटाचे धान्य टप्प्याटप्प्याने थांबविण्यात आले आहे. या जुलै महिन्यापासून गव्हाणी सप्टेंबर महिन्यापासून तांदूळ राज्यातील शेतकऱ्यांना मिळाला नाही. एकीकडे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असताना दुसरीकडे धान्य थांबवल्याने ते चिंतेत सापडले आहेत.
एफसीआय कडून न मिळाल्याने
एफसीआय कडून कोटा न मिळाल्याने शेतकरी गटातील धान्याची वितरण झाले आहे. वरिष्ठांकडे ही बाब मांडण्यात आली आहे. कोटा आला तर धान्याचे वितरण नक्की होईल असे एफसीआय वरिष्ठाकडून सांगण्यात आले आहे.