7/12 Utara Update | 7/12 उताऱ्यावर येणार QR code ! मोबाईल ने होणार स्कॅन

7/12 Utara Update: नमस्कार शेतकरी मंडळी आजच्या या लेखात आपण शेतकऱ्यांना मोठी फायद्याची अशी माहिती घेऊन आलो आहे. तर आपल्याला सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे. की आपल्या शेतीचा महत्वपूर्ण असा दस्तावेज म्हणजे सात बारा व आपल्या जमिनीचे फेर फार चे कागदपत्रे हे आहेत.

आणि या मध्ये 7/12 हे महत्वाचे आहे पण या 7/12 चा खूप ठिकाणी गैर वापर होताना दिसत आहे. आणि हे लक्षात घेता आता आपल्या जमिनीची सर्व माहिती म्हणजे 712 फेरफार ,नकाशा, स्थान ही सर्व माहिती आता सातबरऱ्या वरील qr code नेस्कॅन करून मिळवता येते आहे. या मुळे याचा गैर। अपर आता होणार नाही चला तर आणखी माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्त वाचा

7/12 Utara Update

जमीन खरेदी – विक्री करताना अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडत असतात. एकच जमीन अनेकांना परस्पर विकल्याचे प्रकार यापूर्वी घडल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले आहेत.

त्यामुळे आता जमीन खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण माध्यमातून नकाशे, जमिनीचे फेरफार आणि 7/12 – 8 A उतारे इ. कागदपत्रे कम्प्युटराइज्ड करण्यात आले असून ते आता तुम्ही भूमिअभिलेखाच्या माध्यमातून डाऊनलोडही करू शकता. हीच एकसमानता आणल्यानंतर आता 7/12 – 8 A उतार्‍यावर क्यूआर कोड (QR code) देण्यात येणार आहे.

7/12 उतारे होणार QR code scan

क्यूआर कोड स्कॅन (QR code scan) करताच संबंधित सर्व्हेनंबरचे फेरफार, 7/12 उतारे, जमिनीचा नकाशा, जमिनीचे स्थान, याची माहिती एका स्कॅनवर मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महसूल विभागाच्या भूमिअभिलेख विभागाने राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून लवकरच याबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या उपक्रमामुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून जमीन खरेदी विक्री करताना फसवणूक टळणार आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु कर्ज येथे करा ऑनलाईन अर्ज 

राज्यात तब्बल अडीच कोटी 7/12 उतारे :-

राज्य शासनाने एका परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे की, संपूर्ण राज्यात सुमारे 2 कोटी 52 लाख सातबारा उतारे असून तब्बल 70 लाख मिळकत पत्रिका आहेत.

या सर्व 7/12 मिळकत पत्रिकांना आता भूआधार (Land base) मिळाला असून सातबाऱ्याचा 7/12चा QR कोड स्कॅन केल्यानंतर त्याची माहिती उपलब्ध लगेच उपलब्ध होणार आहे.

याद्वारे शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी आता भू-आधार क्रमांक (Land-base number) (11-अंकी क्रमांक) दिला जाणार आहे.जमीन खरेदी – विक्री करताना अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडत असतात.

हे प्रत्येक सर्वेक्षण केलेल्या जमिनीचे भूआधार क्रमांक ओळखण्यात आणि जमिनीशी संबंधित फसवणूक रोखण्यात मदत होणार आहे. राज्याने या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली असून सातबारा उतार्‍यावर क्यूआर कोड कोठे द्यायचा याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

जुने फेरफार व जुने सातबारा नवीन नोंदणी पद्धत :-

Aapleabhilekh.mahabhumi.gov.in ही
वेबसाईट टाका.
•महसूल विभागाची वेबसाईट ओपन होणार आहे.
•ई-रेकॉर्डस् पाहण्यासाठी e-Records या
पर्यायावर click करा.
•महाराष्ट्र शासन महसूल विभाग’चे पेज ओपन होयील.
•उजवीकडील “भाषा’ पर्यायावर क्लिक करून
भाषा निवड करा.
•डाव्या बाजूला चौकटी “लॉगइन’ व “मदत’ ऑप्शन येईल.

•वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग इन
आयडी आणि पासवर्ड टाकून login करा.
•नोंदणी केलेली नसेल “नवीन वापरकर्ता
नोंदणी’वर क्लिक करा.
•त्यानंतर वैयक्तिक माहिती भरा जसे की तुमचं नाव, मधलं नाव, आडनाव,लिंग,राष्ट्रीयत्व,मोबाईल नंबर आदी माहिती भरा.
•व्यवसाय काय करता, मेल-आयडी,बर्थ डेट ही वैयक्तिक माहिती भरल्यानंतर सविस्तर पत्त्याविषयीचे रकाने भरा.

हेही वाचा :- तुमच्या विहीर किवा बोअरवेल ला लागणार 100% पाणी या पद्धतीचा करा वापर 

लॉग इन आयडी आणि पासवर्ड असा बनवा

•लॉग इन आयडी तयार वेबसाईटच्या निर्देशानुसार लॉग इन आयडी तयार करा.
•निर्देशानुसार पासवर्ड टाका.
•जसेच्या तसे Captcha चौकटीत टाईप करा.
•सबमिट बटण दाबा.
•त्यानंतर स्क्रीनवर वापरकर्ता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा.
•युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

जुने फेरफार, जुने सातबारा कसे काढावे ऑनलाईन :-

•आपला जिल्हा निवडा. पुढे तालुका, गावाचं नाव
आणि अभिलेख प्रकार, फेरफार उतारा, सातबारा, आठ-अ असे पर्याय निवडा.
•असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
•गट क्रमांक टाका व “शोध’ या पर्यायावर क्लिक
करा.
•यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या
गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.
•फेरफाराचं वर्ष, क्रमांक दिलेला असतो.त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहा.
•त्यानंतर पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक
करा.

तुमचा नवीन 7/12 PDF डाउनलोड करण्यासठी येथे दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

•त्यानंतर तुमचं कार्ट ओपन होईल.त्याखाली
असलेल्या “पुढे जा’ या पर्यायावर क्लिक केलं की “डाउनलोड सारांश’ पेज ओपन होईल.
•फाइलची सद्य:स्थिती उपलब्ध आहे’ असे दिसेल.
•फाईल पहा या पर्यायावर क्लिक केलं की तुमच्यासमोर 1982चं फेरफार पत्रक pdf ओपन होईल.


📢 प्रधान मात्री घरकुल योजनेचा असा भर ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान येथे करा अर्ज :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!