50 Thousand Rupees Gift | आता या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्षण व्यतिरिक्त मिलना 50 हजर रु बक्षिस

50 Thousand Rupees Gift: सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतं. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रज्ञानाचा वापर करून. उत्पादन घेता येईल यासाठी नवनवीन प्रयोग राबविले जातात. आता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेण्यासाठी आणि स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे. तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. खरीप पीक उत्पादन स्पर्धा असे याचे नाव आहे.

50 Thousand Rupees Gift

राज्य शासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शेतकऱ्यास 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. या स्पर्धेत सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

महत्वाचे म्हणजे ही स्पर्धा राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पातळीवर सुद्धा आयोजित करण्यात आली आहे. मूग, उडीद, बाजरी, मका, सोयाबीन, नाचणी, भात, ज्वारी, भुईमूग, सूर्यफुल या 11 खरीप हंगाम पिकांसाठी खरीप हंगाम पीक स्पर्धा 2022 मध्ये समावेश करण्यात आलेली आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50% लाख रु अनुदान येथे पहा माहिती 

या स्पर्धेसाठी अटी 

पीक स्पर्धेसाठी तालुका घटक निश्चित केला आहे. ज्या पिकाखालील संबंधित तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र 1000 हेक्टर किंवा त्याहून अधिक असेल अशा पिकांकरिता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे किमान 0.10 हेक्टर सलग क्षेत्रावर लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा सर्वसाधारण व आदिवासी शेतकर्यांंसाठी स्वतंत्र आयोजित केली जाणार आहे.

कोणते शेतकरी असणार पात्र 

पीक स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक व आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रुपये 300 प्रति शेतकरी प्रती पीक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारला जाणार आहे.

पुरेसे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीक स्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करणार आहेत. तालुका पातळीवरील स्पर्धेच्या निकालावरुन पुढे राज्य विभाग व जिल्हा स्तरावर बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत.

हेही वाचा : आता आपल्या जमिनीची मोजणी करा फक्त 5 मिनिटात येथे पहा पूर्ण प्रोसेस 

कधीपर्यंत अर्ज करू शकता

खरीप हंगाम सन 2022-23 मध्ये पीक स्पर्धेसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 31 जुलै 2022 पर्यंत आहे. 31 जुलै पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांवनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

यामध्ये तालुका पातळी – पहिले बक्षीस 5 हजार, तर दुसरे 3 हजार आणि तिसरे 2 हजार जिल्हा पातळी – पहिले 10 हजार, तर दुसरे 7 हजार आणि तिसरे 5 हजार विभाग पातळी – पहिले 25 हजार, तर दुसरे 20 हजार आणि तिसरे 15 हजार राज्य पातळी – पहिले 50 हजार, तर दुसरे 40 हजार तर तिसरे 30 हजार असणार आहे.


📢 पीएम किसान मानधन योजने अतर्गत शेतकर्यांना दर वर्षी मिळणार 36 हजार रु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

close button
error: Content is protected !!